श्री राम आरती (६)

त्रिभुवनमंडितमाळ गळां।

त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥

ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती ।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी ।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें ।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥