श्री राम आरती (३)
आरती ओंवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥
आरती ओंवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥
श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओंवाळूं पाहूं सुंदर मेघश्याम ॥ध्रु०॥
ठकाराचें ठाण करीं धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम० ॥२॥
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती ।
स्वर्गींहूनी देव पुष्पवृष्टि करिती । श्रीराम० ॥३॥
रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटीं ।
आरती ओंवाळूं चवदा भुवनांचे पोटीं ॥ श्रीराम० ॥४॥
विष्णुदास नामा म्हणे मागतों तूतें ।
आरती ओवाळूं पाहूं सीतापतीतें ॥
श्रीराम जय राम जय राम ॥५॥
राम च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री राम आरती (१)
रत्नांचीं कुंडलें माला सुविराजे ॥
मराठी
श्री राम आरती (२)
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं ।
मराठी
श्री राम आरती (४)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
मराठी
श्री राम आरती (५)
जय देव जय देव जय आत्मारामा ।
मराठी
श्री राम आरती (६)
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
मराठी
श्री राम चालीसा (१)
गणपति चरण सरोज गहि ।