श्री राम आरती (४)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥१॥
जय एव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु०॥
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥२॥
निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥
आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।
आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥३॥
अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥४॥
सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।
सोहंभावें तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥५॥
राम च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री राम आरती (१)
रत्नांचीं कुंडलें माला सुविराजे ॥
मराठी
श्री राम आरती (२)
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं ।
मराठी
श्री राम आरती (३)
आरती ओंवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥
मराठी
श्री राम आरती (५)
जय देव जय देव जय आत्मारामा ।
मराठी
श्री राम आरती (६)
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
मराठी
श्री राम चालीसा (१)
गणपति चरण सरोज गहि ।