श्री राम आरती (२)
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं ।
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं ।
अवतरले श्रीराम कौसल्येउदरीं ॥
स्वानंदें निर्भर होती नरनारी ।
आरति घेउनि येती दशरथमंदीरीं ॥१॥
जय देव जय देव जय श्रीरामा ।
आरती ओंवाळू तुज पूर्णकामा ॥ध्रु०॥
पुष्पवृष्टी सुरवर गगनींहुनि करिती ।
दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीतीं ॥
अपसरा गंधर्व गायनें करिती ।
त्रिभुवनीं आल्हादें मंगलें गाती ॥ जय० ॥२॥
कर्णी कुंडल माथां मुकुट सुविराजे ।
नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥
विशाळ सुकपोलीं नेत्रद्वय जलजें ।
षट्पदरुणझुणशब्दें नभमंडळ गाजे ॥ जय० ॥३॥
रामचंद्रा पाहतां वेधलि पैं वृत्ती ।
नयनोन्मीलन ढाळूं विसरलीं पातीं ॥
सुरवर किन्नर जयजयकारें गर्जती ।
कृष्णदासा अंतरीं श्रीराममूर्ती ॥ जय० ॥४॥
राम च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री राम आरती (१)
रत्नांचीं कुंडलें माला सुविराजे ॥
मराठी
श्री राम आरती (३)
आरती ओंवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥
मराठी
श्री राम आरती (४)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
मराठी
श्री राम आरती (५)
जय देव जय देव जय आत्मारामा ।
मराठी
श्री राम आरती (६)
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
मराठी
श्री राम चालीसा (१)
गणपति चरण सरोज गहि ।