श्री राम आरती (४)

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह-अहंभाव रावण निवटोनी ॥१॥ जय एव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु०॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥२॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता । आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥३॥ अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥४॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर । सोहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥५॥

Other Similar Pages