श्री साईं बाबा आरती (८)

पावला प्रसाद आता विठो निजावे,

पावला प्रसाद आता विठो निजावे,
बाबा आता निजावे ।
आपुला तो श्रम कळों येतसे भावे ॥

आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा,
बाबा साई दयाळा ।
पुरले मनोरथ जातो आपुले स्थळ ॥

तुम्हांसी जागवू आम्ही आपुल्या कडे,
बाबा आपुल्या कडे ।
शुभाशुभ कर्मे दोष हरवया पीडा ॥
आता स्वामी…

तुका म्हणे दिधले उचिष्टकें भोजन,
उचिष्टकें भोजन ।
नाही निवडीला आम्हां आपुल्या भिन्न ॥
आता स्वामी…

ललकारा
श्री सचिदानंद सद्गुरू
साईनाथ महाराज कि जय
ओम राजाधिराज योगीराज
परब्रह्म साईनाथ महाराज
श्री सच्चीदानंद सद्गुरू
साईनाथ महाराज कि जय ॥