श्री साईं बाबा आरती (१)
आरती साईबाबा ।
आरती साईबाबा ।
सौख्यदातारा जीवा।
चरणरजतळीं ।
द्यावा दासां विसांवा,
भाक्ता विसावा ॥ध्रु०॥
जाळुनियां अनंग ।
स्वस्वरूपीं राहे दंग ।
मुमुक्षु जनं दावी ।
निज डोळां श्रीरंग,
॥ आरती० ॥१॥
जया मनीं जैसा भाव ।
तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाधना ।
ऐसी तुजी ही माव,
॥ आरती० ॥२॥
तूमचें नाम ध्यातां ।
हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।
मार्ग दावीसी अनाथा,
॥ आरती० ॥३॥
कलियुगीं अवतार ।
सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर,
॥ आरती० ॥४॥
आठां दिवसां गुरुवारीं ।
भक्त करिती वारीं ॥
प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी,
॥ आरती० ॥५॥
माझा निजद्रव्य ठेवा ।
तव चरणरजसेवा ।
मागणें हेंचि आतां ।
तुम्हां देवधिदेवा,
॥ आरती० ॥६॥
इच्छित दीन चातक ।
निर्मल तोय निजसुख ।
पाजावें माधवा या ।
सांभाळ आपुली भाक,
॥ आरती० ॥७॥
साँई बाबा च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (२)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
मराठी
श्री साईं बाबा आरती (३)
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
मराठी
श्री साईं बाबा आरती (४)
आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
मराठी
श्री साईं बाबा आरती (५)
जया जया साईनाथ
मराठी
श्री साईं बाबा आरती (६)
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूत,