कृष्ण

हरि चला मंदिरा आरती

हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।

मराठी English
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।
भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥ धृ० ॥
एकीकडे राई एकीकडे रखुमाई ।
भावें ओवाळितां हरिसी तूं होसी दो ठायीं ॥ हरि० ॥१॥
अष्टाधिक सोळा सहस्र ज्याच्या सुंदरा ज्याच्या सुंदरा ।
जिणें जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ हरि० ॥२॥
एका जनार्दनी हरि तूं लाघवी होसी ।
इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ॥ हरि० ॥३॥