श्री कृष्ण आरती (२)
अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी ।
अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी ।
लावण्यरूपडें हो, तेजःपुंजाळ राशी ॥
उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी ।
उत्साह सुरवरां, महाथोर मानसीं ॥१॥
जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता ।
आरती ओंवाळीन, तुम्हां देवकीसुता ॥ध्रु०॥
कौतुक पहावया, माव ब्रह्मयानें केली ।
वत्सेंही चोरुनियां, सत्य लोकासी नेलीं ॥
गोपाळ, गाई, वत्सें दोहीं ठायीं रक्षिलीं ।
सुखाचा प्रेमसिंधू, अनाथांची माउली ॥ जय० ॥२॥
चारितां गोधलें हो, इंद्र कोपला भारी ।
मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारीं ॥
रक्षिलें गोकुळ हो, नखीं धरिला गिरी ।
निर्भय लोकपाळ, अवतरले हरी ॥ जय० ॥३॥
वसुदेव देवकीची, बंद फोडिली शाळ ।
होऊनियां विश्वजनिता, तयां पोटिंचा बाळ ॥
दैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ ।
राज्य दे उग्रसेना, केला मथुरापाळ ॥ जय० ॥४॥
तारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळून ।
पांडवां सहकारं अडलिया निर्वाणीं ।
गुण मी काय वर्णूं, मति केवढी वानूं ।
विनवितो दास तुका, ठाव मागे चरणीं ॥ जय ० ॥५॥
कृष्ण च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री कृष्ण आरती (१)
श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।
मराठी
श्री कृष्ण आरती (४)
आरती भुवनसुंदराची ।
मराठी
श्री कृष्ण चालीसा
बंशी शोभित कर मधुर, नील जलद तन श्याम ।
मराठी
श्री कृष्ण मंत्र (१)
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
मराठी
श्री कृष्ण मंत्र (२)
ओम नामो कृष्णा देवया प्रेमा राजाइया
मराठी
श्री कृष्ण मंत्र (३)
इदं फ़लं मया देव स्थापित पुर-तस्तव ।