श्री कृष्ण आरती (४)
आरती भुवनसुंदराची ।
आरती भुवनसुंदराची ।
इंदिरावरा मुकुंदाची ॥ध्रु०॥
पद्मसम पादयुग्मरंगा ।
ओंवाळणी होति भृंगा ॥
नखमणि स्रवताहे गंगा ।
जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥
वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ॥
किंकिणीक्वणित, नाद घणघणित,
वांकिवर झुणित, नूपुरें झन्न मंजिराची ।
झनन ध्वनी मंजिराची ॥ आरती भुवन० ॥१॥
पीतपट हाटकतप्तवर्णी ।
कांची नितंब सुस्थानीं ॥
नाभिची अगाध ही करणी ।
विश्वजनकाची जे जननई ॥ चाल ॥
त्रिवलीललित उदरशोभा ।
कंबुगळां माळ विलंबित, झळाळ कौस्तुभ,
सरळ बाहू, श्रीवत्सतरलमणि मरळ कंकणांची ।
प्रीति बहु जडित कंकणांची॥ आरती भुवन० ॥२॥
इंदुसम आस्य कुंदरदना ।
अधरारुणार्क-बिंबवदना ॥
पाहतां भ्रांति पडे मदना ।
सजलमेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥
झळकत मकरकुंडलाभा ।
कुटिलकुंतली, मयूरपत्रावली वेष्टिली,
तिलक भाळिं केशरी झळाळित,कृष्णकस्तुरीची ।
अक्षता भाळिं कस्तुरीची । आरती भुवन० ॥३॥
कल्पद्रुमातळीं मूर्ती ।
सौदामिनी कोटिदीप्ती ॥
गोपीगोपवलय भंवतीं ।
त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥
मंजुळ मधुर मुरलिनादें ।
चकित गंधर्व, चकित अप्सरा,सुरागिरिवरा,
कर्पुराधरा, रतीनें प्रेमयुक्त साची ।
आरती ओंवाळित साची ॥ आरती भुवन० ॥४॥
वृंदावनीचिये हरणीं ।
सखे गे कृष्ण माय बहिणी ॥
श्रमलों भवाब्धिचे फिरणीं ।
आतां मज ठाव देईं चरणीं ॥ चाल ॥
अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ।
नमितों चरण शरण मी, करुणा येऊं दे विशालपाणीम
कृष्ण नेणतें बाळ आपुलें, राखिं लाज याची ।
दयानिधे राखि लाज याची । आरती भुवन० ॥५॥
कृष्ण च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री कृष्ण आरती (१)
श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।
मराठी
श्री कृष्ण आरती (२)
अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी ।
मराठी
श्री कृष्ण चालीसा
बंशी शोभित कर मधुर, नील जलद तन श्याम ।
मराठी
श्री कृष्ण मंत्र (१)
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
मराठी
श्री कृष्ण मंत्र (२)
ओम नामो कृष्णा देवया प्रेमा राजाइया
मराठी
श्री कृष्ण मंत्र (३)
इदं फ़लं मया देव स्थापित पुर-तस्तव ।