श्री कृष्ण आरती (१)

श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।

श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।
आरति करितों बहुप्रेमानें भवभयसंकट दूर करीं ॥ध्रु०॥

दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवरतसी ।
भक्तकाजकल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥
अतिविषधर जो काळा फणिवर कालिया यमुनाजलवासी ।
तत्फणिवर तूं नृत्य करूनी पोंचविलें त्या मुक्तीसी ॥१॥

कैटभ चाणुर कंसादिक हे शौर्यें वधिले अमित अरी ।
नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिति लीला बहुत परी ॥
अपार महिमा श्रवण करोनी भजली त्यातें मुक्त करी ।
दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥२॥