श्री कृष्णाची आरती (३)
ओंवाळूं आरती मदनगोपाळा ।
ओंवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यमसुंदर गळां वैजयंतीमाळा ॥ध्रु०॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमअ ।
ध्वजवज्रांकुश चरणीं ब्रीदाचा तोडर ॥ ओंवाळूं० ॥१॥
नाभिकमळीं ज्याचे ब्रह्मयाचें स्थन ।
हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ ओंवाळूं० ॥२॥
मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी ।
वेधलें मानस हारपली द्रुष्टी । ओंवाळू० ॥३॥
जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥ ओंवाळूं० ॥४॥
एका जनार्दनीं देखियेलें रूप ।
रूप पाहों जातां झालें अवघें तद्रूप ॥ ओंवाळूं आरती० ॥५॥
कृष्ण च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री कृष्ण आरती (१)
श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।
मराठी
श्री कृष्ण आरती (२)
अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी ।
मराठी
श्री कृष्ण आरती (४)
आरती भुवनसुंदराची ।
मराठी
श्री कृष्ण चालीसा
बंशी शोभित कर मधुर, नील जलद तन श्याम ।
मराठी
श्री कृष्ण मंत्र (१)
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
मराठी
श्री कृष्ण मंत्र (२)
ओम नामो कृष्णा देवया प्रेमा राजाइया