श्री साईं बाबा आरती (१)

आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा। चरणरजतळीं । द्यावा दासां विसांवा, भाक्ता विसावा ॥ध्रु०॥ जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग । मुमुक्षु जनं दावी । निज डोळां श्रीरंग, ॥ आरती० ॥१॥ जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाधना । ऐसी तुजी ही माव, ॥ आरती० ॥२॥ तूमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी । मार्ग दावीसी अनाथा, ॥ आरती० ॥३॥ कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर, ॥ आरती० ॥४॥ आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारीं ॥ प्रभुपद पहावया । भवभय निवारी, ॥ आरती० ॥५॥ माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरजसेवा । मागणें हेंचि आतां । तुम्हां देवधिदेवा, ॥ आरती० ॥६॥ इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख । पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक, ॥ आरती० ॥७॥

Other Similar Pages