श्री कृष्ण आरती (४)

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ध्रु०॥ पद्मसम पादयुग्मरंगा । ओंवाळणी होति भृंगा ॥ नखमणि स्रवताहे गंगा । जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥ वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ॥ किंकिणीक्वणित, नाद घणघणित, वांकिवर झुणित, नूपुरें झन्न मंजिराची । झनन ध्वनी मंजिराची ॥ आरती भुवन० ॥१॥ पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंब सुस्थानीं ॥ नाभिची अगाध ही करणी । विश्वजनकाची जे जननई ॥ चाल ॥ त्रिवलीललित उदरशोभा । कंबुगळां माळ विलंबित, झळाळ कौस्तुभ, सरळ बाहू, श्रीवत्सतरलमणि मरळ कंकणांची । प्रीति बहु जडित कंकणांची॥ आरती भुवन० ॥२॥ इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणार्क-बिंबवदना ॥ पाहतां भ्रांति पडे मदना । सजलमेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥ झळकत मकरकुंडलाभा । कुटिलकुंतली, मयूरपत्रावली वेष्टिली, तिलक भाळिं केशरी झळाळित,कृष्णकस्तुरीची । अक्षता भाळिं कस्तुरीची । आरती भुवन० ॥३॥ कल्पद्रुमातळीं मूर्ती । सौदामिनी कोटिदीप्ती ॥ गोपीगोपवलय भंवतीं । त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥ मंजुळ मधुर मुरलिनादें । चकित गंधर्व, चकित अप्सरा,सुरागिरिवरा, कर्पुराधरा, रतीनें प्रेमयुक्त साची । आरती ओंवाळित साची ॥ आरती भुवन० ॥४॥ वृंदावनीचिये हरणीं । सखे गे कृष्ण माय बहिणी ॥ श्रमलों भवाब्धिचे फिरणीं । आतां मज ठाव देईं चरणीं ॥ चाल ॥ अहा हे पूर्ण पुण्यश्लोका । नमितों चरण शरण मी, करुणा येऊं दे विशालपाणीम कृष्ण नेणतें बाळ आपुलें, राखिं लाज याची । दयानिधे राखि लाज याची । आरती भुवन० ॥५॥

Other Similar Pages