श्री हनुमान आरती (२)
जय देवा हनुमंता ।
जय देवा हनुमंता ।
जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा ।
राया रामाच्या दूता ॥
आरती ओंवाळीन ।
ब्रह्मचारी पवित्रा ॥ध्रु०॥
वानरूपधारी ।
ज्याची अंजनी माता ।
हिंडतां वनांतरीं ।
भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त ।
ज्यानें मांडिली कथा ॥ जय० ॥१॥
सीतेच्या शोधासाठीं ।
रामें दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर ।
गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना ।
मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥२॥
सीतेसी दंडवत ।
दोन्ही कर जोडून ॥
वन हें विध्वंसिलें ।
मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी ।
तवं केलें दहन ॥ जय० ॥३॥
निजबळें इंद्रजित ।
होम करीं आपण ॥
तोही त्वां विध्वंसिला ।
लघुशंका करून ॥
देखोनी पळताती ।
महाभूतें दारुण ॥ जय० ॥४॥
राम हो लक्षुमण ।
जरी पाताळीं नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठीम ।
जळीं प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण ।
क्षणामाजिं मर्दिले ॥ जय० ॥५॥
देउनी भुभुःकार ।
नरलोक आटीले ।
दीनानाथ माहेरा त्वां स्वामिसी सोडविलें ॥
घेऊनी स्वामी खांदीं ।
अयोध्येसी आणिलें ॥ जय० ॥६॥
हनुमंत नाम तुझें ।
किती वर्णूं दातारा ॥
अससी सर्वांठायीं ।
हारोहारीं अम्बरा ॥
एका जनार्दनीं ।
मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥७॥
हनुमान