श्री तुळशी आरती (४)
तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।
तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।
अनुदिनी तुळशी तीर्थी करितो आंघोळि ॥
तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।
त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥१॥
जय देवी जय देवी जय मये तुळशी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ध्रु०॥
मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा ।
पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥
आले यमकिंकर म्हणती रविकुमरा ।
तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय० ॥२॥
तुझिया एका दळे सोडविले देव ।
म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥
वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव ।
मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्भाव ॥ जय० ॥३॥
तुळशी