श्री अनंताची आरती

आगमी-लिगमी तुझा न कळेची अंत ।

आगमी-लिगमी तुझा न कळेची अंत ।
भक्तिभावें प्रेमें भक्तां वर देत ॥
मुनिजन लक्षीं लक्षितां नव्हें तूं प्राप्त ।
शेष सहस्त्रमुखीं वर्णितां श्रमत ॥१॥

जय देव जय देव जय श्री अनंता ।
आरती ओवाळूं तुज आनंद भरिता ॥ध्रु०॥

भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती ।
षोडशपूजा करुनी ब्राह्मण पूजीती ॥
गोधुमवायन चौदा द्विजांसि अर्पीती ।
त्यांसी सर्वहि सिद्धी देसी श्रीपती ॥ जय देव० ॥२॥

कौडिण्य ब्राह्मण व्रत हें आचरला ।
करुणासागर तया प्रसन्न झाला ॥
भक्तीचा अंकूर त्रिभुवनिं विस्तरला ।
एका जनार्दन चरणीं नीवाला ॥ जय० ॥३॥