श्री तुळशी आरती (४)

तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं । अनुदिनी तुळशी तीर्थी करितो आंघोळि ॥ तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी । त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥१॥ जय देवी जय देवी जय मये तुळशी । अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ध्रु०॥ मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा । पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥ आले यमकिंकर म्हणती रविकुमरा । तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय० ॥२॥ तुझिया एका दळे सोडविले देव । म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥ वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव । मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्‌भाव ॥ जय० ॥३॥

Other Similar Pages