श्री शंकर आरती (२)
धवळे भोळे चक्रवर्ती ।
धवळे भोळे चक्रवर्ती ।
धवळे अलंकार शोभती ।
धवलें धाम उमापती ।
सदा चित्तीं चिंतावा ॥ध्रु०॥
धवळ्या जटा गंगाजाळ ।
धवळा मयंक निर्मळ ।
धवले कुंडलांचा लोळ ।
शंखमाळ लोंबती ॥१॥
धवळी स्फटिकांची माळ ।
धवळे गळां उलथे व्याळ ।
धवळें हातीं नर-कपाळ ।
धवळा त्रिशूळ शोभतसे ॥२॥
धवळा सर्वांगें आपण ।
धवळें विभूतीचें लेपन ।
धवळें गात्र धवळें वसन ।
धवळें वाहन नंदीचें ॥३॥
धवळें कैलास भुवन ।
धवळें मध्यें सिंहासन ।
धवळें शंकराचें ध्यान ।
दास चिंतन करीतसे ॥४॥
शंकर