श्री विष्णु आरती (३)

लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला ।

लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला ।
बहु प्रेमानें पंचारति ही करित असो बा तुज विमला ॥ध्रु०॥

दृढ भक्ती पाहुनियां दिधलें ध्रुवपद जैसें ध्रुवबाला ।
अर्जुनरथिं सारथ्य हि करुनि अवगाहीलें अश्वांला ॥
ऐकुनि ऐशा तव औदार्या आठवितो तव पदकमला ।
दृढ भक्तीनें रुक्मिणिसुत हा, देईं दर्शना तव विमला ॥१॥