श्री विष्णु आरती (१)
आरती आरती करूं गोपाळा ।
आरती आरती करूं गोपाळा ।
मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ध्रु०॥
आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें ।
भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें ।
जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥१॥
रमावल्लभदासें अहंधूप जाळिला ।
एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥
सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा ।
समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० ॥२॥
हरिखें हरीख होतो मुख पाहतां ।
प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥
सद्भावालागीं बहु हा देव भूकेला ।
रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती० ॥३॥
फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।
तया उपरी नीरांजनें मांडिलीं ॥
पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।
विश्व हें लोपलें तया प्रकाशातळीं ॥ आरती० ॥४॥
आरतीप्रकाशें चंद्रसूर्य लोपले ।
सुरवर नभीं तेथें तटस्थ ठेले ॥
देवभक्तपण न दिसे कांहीं ।
ऐशापरी दास रमावल्लभा पायीं ॥ आरती० ॥५॥
विष्णु च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री विष्णु आरती (२)
नारायण खगवाहन चतुराननताता ।
मराठी
श्री विष्णु आरती (३)
लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला ।
मराठी
श्री विष्णु चालीसा (१)
महिम्नस्ते पारं विधिहरफणीन्द्रप्रभृतयो
मराठी
श्री विष्णु चालीसा (२)
जै जै श्री जगत पति जगदाधार अनन्त ।
मराठी
श्री विष्णु मंत्र
ॐ नमोः नारायणाय ॥१॥