श्री लक्ष्मी आरती (२)
ॐ नमो आद्यरूपे ।
ॐ नमो आद्यरूपे ।
देवी भगवती माते ॥
काळिका कामरूप ।
शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया ।
मूळपीठ देवते ॥
झालिया भेटी तूझी ।
नीवारिसी पापंतें ॥१॥
जय श्रीकुलदेवते ।
महालक्ष्मी ग माते ।
आरती घेउनीयां ।
ओंवाळीन मी तूतें ॥ ध्रु० ॥
अंबिका भद्रकाली ।
देवी आद्या कुमारी मारिलें चंडमुंड ।
महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देवद्विज ।
गाती जयजयकारी ॥
उजळुनी दीपमाळा ।
ओंवाळीती नरनारी ॥ जय० ॥२॥
परिधान हेमवर्ण ।
कंठीं नवरत्नें हार ॥
करतळें रातोत्पळें ।
अद्भुत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी ।
केला प्रताप थोर ॥
मारिले दैत्य बिकट ।
अघट कोल्हासुर ॥ जय० ॥३॥
नासिकीं मुक्ताफळ ।
रत्नकुंडलें श्रवणीं ॥
घवघवीत नेपुरें हो ।
अंदु वाजती चरणीं ॥
मस्तकीं पुष्पहार ।
दिसे भासे वदनीं ॥
पौर्णिमाचंद्रबिंब ।
पृष्ठीवरी रुळे वेणी ॥ जय० ॥४॥
नवकोटी कात्यायनी ।
चतुःषष्टी योगिनी ॥
भूचरां जलचरां ।
आई तुजपासुनी ॥
ऐसी तूं महालक्ष्मी जगताची जननी ॥
नामया विष्णुदासा ।
तुझें चिंतन ध्यानीं ॥ जय० ॥५॥
लक्ष्मी