श्री शंकर आरती (२)

धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती । धवलें धाम उमापती । सदा चित्तीं चिंतावा ॥ध्रु०॥ धवळ्या जटा गंगाजाळ । धवळा मयंक निर्मळ । धवले कुंडलांचा लोळ । शंखमाळ लोंबती ॥१॥ धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ । धवळें हातीं नर-कपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥२॥ धवळा सर्वांगें आपण । धवळें विभूतीचें लेपन । धवळें गात्र धवळें वसन । धवळें वाहन नंदीचें ॥३॥ धवळें कैलास भुवन । धवळें मध्यें सिंहासन । धवळें शंकराचें ध्यान । दास चिंतन करीतसे ॥४॥

Other Similar Pages