शंकर

श्री मंगेश आरती

जय देव जय देव श्रीमंगेशा ।

मराठी English
जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥
॥ध्रु०॥
सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥
त्रिपुरारी अघहारी शिवमस्तकधारी ।
विश्वंभर विरुदे हें मम संकट धारिं ॥
॥ जय० ॥१॥
भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ॥
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।
अभिनव कृपाकटाक्षें मतिउत्सव द्यावा ॥
॥ जय० ॥२॥
शिव शिव जपतां शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करिं शत्रुविनाशा ॥
कुळवृद्धीते पाववि हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ॥
॥ जय० ॥३॥