श्री शनिदेव आरती
जय जय श्रीशनिदेवा ।
जय जय श्रीशनिदेवा ।
पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओंवाळीतों ।
मनोभावें करुनी सेवा ॥ध्रु०॥
सूर्यसुता शनिमूर्ती ।
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखें काय वर्णूं ।
शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥१॥
नवग्रहामाजीं श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी ।
होय रंकाचा राजा ॥ जय० ॥२॥
विक्रमासारिखा हो ।
शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली ।
बहु छळियेलें त्यासी ॥ जय० ॥३॥
शंकराच्या वरदानें ।
गर्व रावणें केला ।
साडेसाती येतां त्यासी ।
समूळ नाशासी नेला ॥ जय० ॥४॥
प्रत्यक्ष गुरुनाथा ।
चमत्कार दावियेला ।
नेऊनी शूळापाशीं ।
पुन्हा सन्मान केला ॥ जय० ॥५॥
ऐसे गुण किती गाऊं ।
धणी न पुरे गातां ॥
कृपा करीं दीनावरीं ।
महाराजा समर्था ॥ जय० ॥६॥
दोन्ही कर जोडोनीयां ।
रुक्मा लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मार्गे ।
उदयकाळ सौख्य दावीं ॥ जय जय० ॥७॥
शनिदेव