श्री परशुराम आरती
जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना ।
जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना ।
अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना ॥
अगणित महिमा तुझा न कळे सुरगणां ।
वदतों कंठीं वाणी सरसीरुहनयना ॥१॥
जय राम श्रीरम जय भार्गवरामा ।
नीरांजन करुं तुजला परिपूर्णकामा ॥ध्रु०॥
सह्याद्रिगिरिशिखरी शर घेउनि येसी ।
सोडुनि शर पळवीसी पश्चिमजलधीसी ॥
तुजसम रणधीर जगीं न पडे दृष्टीसी ।
प्रताप थोर तुझा नकळे कवणासी ॥ जय० ॥२॥
तव कोप बहु पापी बाणें संहारी ।
दानवदहन करुनी वससी गिरिशिखरीं ।
क्षत्रिय मारुनि अवनी केली निवैंरी ।
सात्त्विक राजस तामस त्रिगुणां उद्धरी ॥ जय० ॥३॥
द्रुढ भावें तव वंदन करिती जे चरणीं ।
त्यांतें भवभय नाहीं जंववरि शशितरणी ॥
शर मारुनी उद्भविली गंगा जनतरणी ।
चिंतामणि शरणागत निश्चित तव चरणीं ॥ जय राम श्रीराम० ॥४॥
परशुराम