श्री अन्नपूर्णा आरती

श्री अन्नपूर्ण देवी जयजय जगदबे जननी ।

श्री अन्नपूर्ण देवी जयजय जगदबे जननी ।
तुज ऐसी देवता नाही कोणी त्रिभूवनी ॥ध्रु०॥

विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षण होती ।
ती दोघेही अनन्य भावे तव भक्ति करिती ॥
तुझ्या प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती ।
सुखशांती लाभली देवी ऐसी तव कीर्ती ॥१॥

नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी ।
नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरूनी ॥
जीवन जरि हैं भरले आहे व्याधि-उपाधींनी ।
प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळूनी ॥२॥

छंद मनाला तुजा लागला मी करितो धांवा ।
धावुनी ये देवते पाहुनी मम भक्तिभाव ॥
अखंड शाश्व्त प्रेमसुखाचा दे मजला ठेवा ।
जन्ममूत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी धावा ॥३॥

तू माझी मावली जाण मी बालक तव तान्हा ।
क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ॥
अन्नवसत्र दे वैभव सारे सुख भोगहि नाना ।
मिलिंदमाधव करी प्रार्थना वंदुनी तव चरणां ॥४॥