श्री शनिदेव आरती

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओंवाळीतों । मनोभावें करुनी सेवा ॥ध्रु०॥ सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥१॥ नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तूझा ॥ ज्यावरी तूं कृपाकरिसी । होय रंकाचा राजा ॥ जय० ॥२॥ विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥ गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियेलें त्यासी ॥ जय० ॥३॥ शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला । साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ॥ जय० ॥४॥ प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला । नेऊनी शूळापाशीं । पुन्हा सन्मान केला ॥ जय० ॥५॥ ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ॥ कृपा करीं दीनावरीं । महाराजा समर्था ॥ जय० ॥६॥ दोन्ही कर जोडोनीयां । रुक्मा लीन सदा पायीं ॥ प्रसाद हाचि मार्गे । उदयकाळ सौख्य दावीं ॥ जय जय० ॥७॥

Other Similar Pages