श्री परशुराम आरती

जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना । अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना ॥ अगणित महिमा तुझा न कळे सुरगणां । वदतों कंठीं वाणी सरसीरुहनयना ॥१॥ जय राम श्रीरम जय भार्गवरामा । नीरांजन करुं तुजला परिपूर्णकामा ॥ध्रु०॥ सह्याद्रिगिरिशिखरी शर घेउनि येसी । सोडुनि शर पळवीसी पश्चिमजलधीसी ॥ तुजसम रणधीर जगीं न पडे दृष्टीसी । प्रताप थोर तुझा नकळे कवणासी ॥ जय० ॥२॥ तव कोप बहु पापी बाणें संहारी । दानवदहन करुनी वससी गिरिशिखरीं । क्षत्रिय मारुनि अवनी केली निवैंरी । सात्त्विक राजस तामस त्रिगुणां उद्धरी ॥ जय० ॥३॥ द्रुढ भावें तव वंदन करिती जे चरणीं । त्यांतें भवभय नाहीं जंववरि शशितरणी ॥ शर मारुनी उद्भविली गंगा जनतरणी । चिंतामणि शरणागत निश्चित तव चरणीं ॥ जय राम श्रीराम० ॥४॥

Other Similar Pages