श्री संतोषी आरती

जय देवी जय देवी, संतोषी माता ।

जय देवी जय देवी, संतोषी माता ।
शरण आलो तव चरणी ठेवियला माथा ॥ध्रु०॥

अखंड पूजन तुझे ।
महिला ज्या करती ।
प्रसन्न त्यांना होशी, तू त्यांच्या भक्तीवरती ।
विपुल जीवनामध्ये लाभे संपत्ती ।
असंख्य अबला, शुक्रवार धरिती ॥ जय० ॥१॥

सकाळ सायंकाळी, तुझेच ते नाम ।
तुझ्याच नाव सकला, पावे तो राम।
तुझ्याच कृपे माते, होई खरे काम ।
कष्ट करीत हाती, मिळे पुरा दाम ॥ जय० ॥२॥

जगताचा दाट, तो विष्णू भगवंत ।
भार्या त्याची लक्ष्मी, शोभे गुणवंत ।
लक्ष्मीविना मानव तो दारिद्र्यात ।
लक्ष्मी ज्याच्या पदरी, तो आनंदात ॥ जय० ॥३॥

उपवासाच्या दिवशी, आंबट ना खावे ।
घरात परिवाराने आनंदे राहावेत ।
अंतर त्या व्रताला, कधीच ना धावे ।
भक्त मधुकर सांगे, समजावून घायावे ॥४॥