श्री नृसिंहाची आरती

कडकडिला स्तंभ गडगडिलें गगन ॥ अवनी होत आहे कंपायमान ॥ तडतडलीं नक्षत्रें पडतातीं जाण ॥ उग्ररूपें प्रगटे नृसिंहवदन ॥ १ ॥ जय देव जय देव जय नरहरिराया ॥ आरती ओंवाळूं महाराजवर्या ॥ ध्रु० ॥ एकवीस स्वर्गमळा डळमळली कैसी ॥ ब्रह्मयाच्या वाटे अभिनव वाटे अभिनव चित्तासी ॥ चंद्रसूर्य दोन्ही लोपती प्रकाशीं ॥ कैलासी शंकर दचके मानसी ॥ जय० ॥ २ ॥ थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित ॥ तीक्ष्ण नखें तो दैत्य विदारीत ॥ अर्धांगी कमलजा शिरिं छाया धरित ॥ माधवदासा स्वामी नरहरि शोभत ॥ जय देव जय देव० ॥ ३ ॥

Other Similar Pages