श्री हनुमान आरती (२)
जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥ ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥ आरती ओंवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ध्रु०॥ वानरूपधारी । ज्याची अंजनी माता । हिंडतां वनांतरीं । भेटी झाली रघुनाथा ॥ धन्य तो रामभक्त । ज्यानें मांडिली कथा ॥ जय० ॥१॥ सीतेच्या शोधासाठीं । रामें दिधली आज्ञा ॥ उल्लंधुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ॥ शोधूनी अशोकवना । मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥२॥ सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥ वन हें विध्वंसिलें । मारिला अखया दारुण । परतोनी लंकेवरी । तवं केलें दहन ॥ जय० ॥३॥ निजबळें इंद्रजित । होम करीं आपण ॥ तोही त्वां विध्वंसिला । लघुशंका करून ॥ देखोनी पळताती । महाभूतें दारुण ॥ जय० ॥४॥ राम हो लक्षुमण । जरी पाताळीं नेले ॥ तयांच्या शुद्धीसाठीम । जळीं प्रवेश केले ॥ अहिरावण महिरावण । क्षणामाजिं मर्दिले ॥ जय० ॥५॥ देउनी भुभुःकार । नरलोक आटीले । दीनानाथ माहेरा त्वां स्वामिसी सोडविलें ॥ घेऊनी स्वामी खांदीं । अयोध्येसी आणिलें ॥ जय० ॥६॥ हनुमंत नाम तुझें । किती वर्णूं दातारा ॥ अससी सर्वांठायीं । हारोहारीं अम्बरा ॥ एका जनार्दनीं । मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥७॥