श्री हनुमान आरती (१)

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥ गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ध्रु०॥ दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥ कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥ रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥२॥

Other Similar Pages