श्री साईं बाबा आरती (६)

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूत,
बाबा करा साईनाथ
चिन्मय हे सुखधाम जाउनी बहुदा एकांत ।
वैराग्याचा कुंचा घेऊनि चौका झाडीला
बाबा चौका झाडीला
त्यावरी शुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥
आता…

पायघडया घातल्या सुंदर नवविधा भक्तही,
बाबा नवविधा भक्तही
जनांच्या संख्या लावूनी उजळल्या ज्योती ॥
आता…

भावार्थाचा मंचक ह्रदयकासी टांगीला,
बाबा कशी टांगीला
मनाची सुमने करुनि केले शेजेला ॥
आता…

द्वैताचें कपात लावूनी एकत्र केले,
बाबा एकत्र केले
दूरमुद्धीच्या गाठी सोडूनि पडदे सोडिले ॥
आता…

असा तृष्ण कल्पनेचा सोडूनि गलबला,
बाबा सोडूनि गलबला
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥
आता…

लक्ष्य उन्मनी घेऊनि,
बाबा नाजूक दुःखाला,
बाबा नाजूक दुःखाला,
निरंजन सद्गुरू स्वामी निजविला शेजेला
आता…

सद्गुरू साईनाथ महाराजा कि जय…

Other Similar Pages