श्री संतोषी आरती
जय देवी जय देवी, संतोषी माता । शरण आलो तव चरणी ठेवियला माथा ॥ध्रु०॥ अखंड पूजन तुझे । महिला ज्या करती । प्रसन्न त्यांना होशी, तू त्यांच्या भक्तीवरती । विपुल जीवनामध्ये लाभे संपत्ती । असंख्य अबला, शुक्रवार धरिती ॥ जय० ॥१॥ सकाळ सायंकाळी, तुझेच ते नाम । तुझ्याच नाव सकला, पावे तो राम। तुझ्याच कृपे माते, होई खरे काम । कष्ट करीत हाती, मिळे पुरा दाम ॥ जय० ॥२॥ जगताचा दाट, तो विष्णू भगवंत । भार्या त्याची लक्ष्मी, शोभे गुणवंत । लक्ष्मीविना मानव तो दारिद्र्यात । लक्ष्मी ज्याच्या पदरी, तो आनंदात ॥ जय० ॥३॥ उपवासाच्या दिवशी, आंबट ना खावे । घरात परिवाराने आनंदे राहावेत । अंतर त्या व्रताला, कधीच ना धावे । भक्त मधुकर सांगे, समजावून घायावे ॥४॥