श्री विष्णु आरती (२)
नारायण खगवाहन चतुराननताता । स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥ वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां । सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥१॥ जय देव जय देव जय लक्ष्मीकांता । मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ध्रु०॥ सदैव लालन पालन विश्वाचें करिसी । दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥ दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी । निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥२॥ चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासीं । कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥ कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी । ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥३॥ तारीं वारीं संकट मारी षड्रिपुला । स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥ तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला । दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥४॥