श्री लक्ष्मी आरती (२)

ॐ नमो आद्यरूपे । देवी भगवती माते ॥ काळिका कामरूप । शक्ति तूं जगन्माते ॥ वैष्णवी भूतमाया । मूळपीठ देवते ॥ झालिया भेटी तूझी । नीवारिसी पापंतें ॥१॥ जय श्रीकुलदेवते । महालक्ष्मी ग माते । आरती घेउनीयां । ओंवाळीन मी तूतें ॥ ध्रु० ॥ अंबिका भद्रकाली । देवी आद्या कुमारी मारिलें चंडमुंड । महिषासुर हे वैरी ॥ हर्षले देवद्विज । गाती जयजयकारी ॥ उजळुनी दीपमाळा । ओंवाळीती नरनारी ॥ जय० ॥२॥ परिधान हेमवर्ण । कंठीं नवरत्नें हार ॥ करतळें रातोत्पळें । अद्भुत जयजयकार ॥ अवतार कोल्हापुरी । केला प्रताप थोर ॥ मारिले दैत्य बिकट । अघट कोल्हासुर ॥ जय० ॥३॥ नासिकीं मुक्ताफळ । रत्नकुंडलें श्रवणीं ॥ घवघवीत नेपुरें हो । अंदु वाजती चरणीं ॥ मस्तकीं पुष्पहार । दिसे भासे वदनीं ॥ पौर्णिमाचंद्रबिंब । पृष्ठीवरी रुळे वेणी ॥ जय० ॥४॥ नवकोटी कात्यायनी । चतुःषष्टी योगिनी ॥ भूचरां जलचरां । आई तुजपासुनी ॥ ऐसी तूं महालक्ष्मी जगताची जननी ॥ नामया विष्णुदासा । तुझें चिंतन ध्यानीं ॥ जय० ॥५॥

Other Similar Pages