श्री राम आरती (६)

त्रिभुवनमंडितमाळ गळां। आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥ ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥ भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥ रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी । आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥ विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें । आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा ॥

Other Similar Pages