श्री राम आरती (५)
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ध्रु०॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥१॥ बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा । हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगीं आत्मराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥२॥