श्री राम आरती (३)
आरती ओंवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओंवाळूं पाहूं सुंदर मेघश्याम ॥ध्रु०॥ ठकाराचें ठाण करीं धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम० ॥२॥ भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गींहूनी देव पुष्पवृष्टि करिती । श्रीराम० ॥३॥ रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटीं । आरती ओंवाळूं चवदा भुवनांचे पोटीं ॥ श्रीराम० ॥४॥ विष्णुदास नामा म्हणे मागतों तूतें । आरती ओवाळूं पाहूं सीतापतीतें ॥ श्रीराम जय राम जय राम ॥५॥