श्री राम आरती (२)

अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं । अवतरले श्रीराम कौसल्येउदरीं ॥ स्वानंदें निर्भर होती नरनारी । आरति घेउनि येती दशरथमंदीरीं ॥१॥ जय देव जय देव जय श्रीरामा । आरती ओंवाळू तुज पूर्णकामा ॥ध्रु०॥ पुष्पवृष्टी सुरवर गगनींहुनि करिती । दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीतीं ॥ अपसरा गंधर्व गायनें करिती । त्रिभुवनीं आल्हादें मंगलें गाती ॥ जय० ॥२॥ कर्णी कुंडल माथां मुकुट सुविराजे । नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥ विशाळ सुकपोलीं नेत्रद्वय जलजें । षट्पदरुणझुणशब्दें नभमंडळ गाजे ॥ जय० ॥३॥ रामचंद्रा पाहतां वेधलि पैं वृत्ती । नयनोन्मीलन ढाळूं विसरलीं पातीं ॥ सुरवर किन्नर जयजयकारें गर्जती । कृष्णदासा अंतरीं श्रीराममूर्ती ॥ जय० ॥४॥

Other Similar Pages