श्री भैरवनाथ आरती
जय देव जय देव जय भैरवनाथा । सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ध्रु०॥ भैरवनाथा गौरव दे मज भजनाचें । रौरव संकट नाशी जनना- निधनाचें ॥ निशिदिनिं देवा दे मज गुणकीर्तन वाचे । कैरवपदनखचंद्रीं करिं मन मम साचें ॥ जय० ॥१॥ भवभयभंजन सज्ज्नरंजन गुरुदेवा । पदरजअंजन लेतां प्रगटे निज ठेवा ॥ जेव्हां दर्शन देसी भाग्योदय तेव्हां । अनंत पुण्यें लाधे आम्हां तव सेवा ॥ जय० ॥२॥ कलिमलशमना दानवदमना दे पाणी । डमरूरव अमरांते निर्भय सुखदानी । काशीरक्षक तक्षकमालाधर चरणीं । तोडर मिरवी अरिंगन मस्तकिं मनकर्णी ॥ झय० ॥३॥ लक्षीं करुणाचक्षी अनुचर निजपक्षी । भक्षीं दुष्टां सुष्टां संरक्षीं ॥ साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षीं । मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥ जय० ॥४॥ सोनारीं पुरधामीं भैरव कुळस्वामी । स्मरतां सत्वर पावसि संकटहरनामीं ॥ इच्छित देसी दासां जो जो जें कामी । मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय० ॥५॥