श्री तुळशी आरती (३)

वृंदावनवासी जय माये तुळशी । शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥ मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी । तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥१॥ जय देव जय देवी जय तुळशी माते । करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ध्रु०॥ कार्तिकशुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न । तुझे वृंदावनी निशिदिनिं श्रीकृष्ण ॥ स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण । भक्त चिंतन करितां करिसी पावन ॥ जय० ॥२॥ त्रिभुवनिं तुझी सेवा करिती त्रिकाळ । त्यांतें सुख देऊनी तारी गोपाळ ॥ तुझें स्तवन ऎकुनि कांपति कळिकाळ । पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ ॥ जय० ॥३॥

Other Similar Pages