श्री तुळशी आरती (१)
जय देव जय देवी जय माये तुळशी । निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ध्रु०॥ ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी । अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥ सेवा करिती भावें सकळहि नरनारी । दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी० ॥१॥ शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी । मंजिरिची बहु आवड कमलारमणासी । सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी । विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी० ॥२॥ अच्युत माधव केशव पीतांबरधारी । तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥ त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी । गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥३॥