श्री अनंताची आरती
आगमी-लिगमी तुझा न कळेची अंत । भक्तिभावें प्रेमें भक्तां वर देत ॥ मुनिजन लक्षीं लक्षितां नव्हें तूं प्राप्त । शेष सहस्त्रमुखीं वर्णितां श्रमत ॥१॥ जय देव जय देव जय श्री अनंता । आरती ओवाळूं तुज आनंद भरिता ॥ध्रु०॥ भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती । षोडशपूजा करुनी ब्राह्मण पूजीती ॥ गोधुमवायन चौदा द्विजांसि अर्पीती । त्यांसी सर्वहि सिद्धी देसी श्रीपती ॥ जय देव० ॥२॥ कौडिण्य ब्राह्मण व्रत हें आचरला । करुणासागर तया प्रसन्न झाला ॥ भक्तीचा अंकूर त्रिभुवनिं विस्तरला । एका जनार्दन चरणीं नीवाला ॥ जय० ॥३॥