श्री कृष्णाची आरती (३)

ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यमसुंदर गळां वैजयंतीमाळा ॥ध्रु०॥ चरणकमल ज्याचे अति सुकुमअ । ध्वजवज्रांकुश चरणीं ब्रीदाचा तोडर ॥ ओंवाळूं० ॥१॥ नाभिकमळीं ज्याचे ब्रह्मयाचें स्थन । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ ओंवाळूं० ॥२॥ मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी । वेधलें मानस हारपली द्रुष्टी । ओंवाळू० ॥३॥ जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥ ओंवाळूं० ॥४॥ एका जनार्दनीं देखियेलें रूप । रूप पाहों जातां झालें अवघें तद्रूप ॥ ओंवाळूं आरती० ॥५॥

Other Similar Pages