श्री अन्नपूर्णा आरती
श्री अन्नपूर्ण देवी जयजय जगदबे जननी । तुज ऐसी देवता नाही कोणी त्रिभूवनी ॥ध्रु०॥ विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षण होती । ती दोघेही अनन्य भावे तव भक्ति करिती ॥ तुझ्या प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती । सुखशांती लाभली देवी ऐसी तव कीर्ती ॥१॥ नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी । नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरूनी ॥ जीवन जरि हैं भरले आहे व्याधि-उपाधींनी । प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळूनी ॥२॥ छंद मनाला तुजा लागला मी करितो धांवा । धावुनी ये देवते पाहुनी मम भक्तिभाव ॥ अखंड शाश्व्त प्रेमसुखाचा दे मजला ठेवा । जन्ममूत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी धावा ॥३॥ तू माझी मावली जाण मी बालक तव तान्हा । क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ॥ अन्नवसत्र दे वैभव सारे सुख भोगहि नाना । मिलिंदमाधव करी प्रार्थना वंदुनी तव चरणां ॥४॥